उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक ट्विट
नव्या राजकीय वादळाचे संकेत?
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. नेतेमंडळी प्रचारसभा घेण्यात व्यस्त आहेत. प्रचार सभांमध्ये व्होट जिहाद, बटेंगे तो कटेंगे हे मुद्दे गाजत आहेत. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चाणा उधाण आलं आहे.
खडकवासलामधल्या सभेत फडणवीसांनी नोमानींची ऑडिओ क्लिप ऐकवली होती. अशातच आता फडणवीसांनी ट्वीट केलं आहे. तर, दुसरीकडे, किरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहून मौलाना सज्जाद नोमानींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
किरीट सोमय्यांनी सज्जाद नोमानींचा एक व्हिडीओ समोर आणला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्यांचे सोशल बॉयकॉट करा, असं आवाहन व्हिडीओद्वारे नोमानी करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याच व्हिडीओवरुन किरीट सोमय्यांनी मौलाना सज्जाद नोमानींवर व्होट जिहादचा आरोप केला आहे. तसेच, यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्रही लिहिलं आहे. तसेच, या पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे मौलाना सज्जाद नोमानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.