"पवारांनंतर मीच" म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवार म्हणाले, "म्हण बाबा माझी काय तक्रार नाही पण ."
बारामती : खरा पंचनामा
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात काही प्रमुख मतदारसंघ आहेत. ज्याठिकाणी रंजक लढत होणार आहे. त्यातीलच सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ. याठिकाणी पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. यासाठी दोन्ही पवारांकडून जोरदार प्रचार देखील सुरु आहे. दरम्यान, याच प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना आवाहन करताना पवारांनंतर मीच असल्याचे म्हटले होते. त्यांच्या याच विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
बारामतीत अजित पवार जोरदार प्रचार करत आहेत. त्यासाठी ते काही दिवसांपासून बारामतीत मुक्कामासाठी आहेत. गावोगावी जाऊन ते मतदानासाठी आवाहन करत आहे. त्यांनी अनेकदा लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आणि त्यांनी या मतदारसंघासाठी केलेल्या विकास कामांची उजळणी केली आहे. लोकसभेत तुम्ही मोठ्या पवारांना साथ दिली. हरकत नाही. पण आता या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन त्यांनी अनेक सभांमधून केले आहे.
प्रत्येक गावात शरद पवार यांची मोठं-मोठी बॅनर पाहून अजितदादांनी महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीच्या गटाला चिमटा काढला आहे. शरद पवार निवडणुकीला उभे आहेत की युगेंद्र पवार हे अगोदर सांगा असा टोला त्यांनी युगेंद्र पवारांना लगावला आहे. तर युगेंद्र याला लाखात कुठं टिंब देतात हे तर माहिती आहे का? असा टोला त्यांनी लगावला होता. त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी आणि काकींवर पण प्रचारातून निशाणा साधला आहे. त्यातच आता 'पवारांनंतर मीच' या वक्तव्यांनी सर्वांचा आश्चर्याचा धक्का बसला आहे.
'पवारांनंतर मीच' या अजितदादांच्या वक्तव्याचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला. "लोकांनी गंमत काय केली. त्यांनी लोकशाहीपद्धतीने मतदान केलं. त्यांना मतदान केलं नाही एवढंच ना. लोकांचा अधिकार आहे. लोकांनी कुणालाही मतदान केलं. उद्या कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख. म्हण बाबा माझी काय तक्रार. लोकांनी म्हटलं पाहिजे ना. मी म्हणून काय उपयोग", असा टोला त्यांनी लगावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.