ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंना धक्का, पैसे वाटल्याच्या आरोपात आमदारावर गुन्हा दाखल
कळमनुरी : खरा पंचनामा
विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आल्या असून, त्यासाठी आता सगळेच पक्ष आपली ताकद पणाला लावताना दिसत आहेत. यावेळी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी वेगवेगळी प्रलोभणं देण्याचाही प्रयत्न होतो.
त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या एका आमदारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. निवडणुकीपूर्वी मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांच्यावर करण्यात आले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते शिवाजी माने यांनी केलेल्या आरोपांनंतर आता संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघात यंदा विधानसभा निवडणुकीपूर्वी चांगलाच राडा सुरू असल्याचं दिसतोय. काल वाकोडी गावांमध्ये ठाकरे गटाची प्रचारा साठी गेलेली गाडी फोडल्यानं राडा झाला. त्यानंतर आता ठाकरे गटाने महायुतीचे उमेदवार आमदार संतोष बांगर यांच्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप केला होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजी माने यांनी आमदार बांगर यांच्या विरोधामध्ये कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आमदार बांगर यांच्या फॉर्महाऊस जवळ मागच्या चार दिवसांपासून कोणतीही परवानगी नसताना मंडप टाकून साऊंड सिस्टिम लावून बेकायदेशीररित्या लोकांना जमा करत पैसे वाटप करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर माजी खासदार शिवाजी माने यांच्या तक्रारीवरुन संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.