अमित शाह यांच्या विदर्भातील सर्व सभा रद्द, अचानक दिल्लीकडे रवाना
नागपुर : खरा पंचनामा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर असलेले भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रविवारी होणाऱ्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत. अमित शाह यांच्या विदर्भात चार सभा होणार होत्या. या सभा रद्द करुन तातडीने नागपूरवरुन दिल्लीकडे रवाना झाले आहे. त्यांच्या सभा का रद्द झाल्या? या सभा प्रशासकीय कारणांमुळे रद्द झाल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. अमित शाह यांच्याऐवजी आता स्मृती ईराणी सभा घेणार आहे.
अमित शाह यांच्या रविवारी विदर्भात चार सभा होणार होत्या. गडचिरोली, वर्धा, काटोल आणि सावनेर येथे सभा होणार होत्या. परंतु त्यांच्या या सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहे. राज्यातील निवडणूक प्रचार १८ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे प्रचारास केवळ एकच दिवस शिल्लक असताना अमित शाह यांच्या सर्व सभा रद्द झाल्या आहेत. ते तातडीने नागपूरवरुन नवी दिल्लीकडे रवाना झाले आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून अमित शाह ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहे. त्यानुसार रविवारी त्यांच्या चार सभा होणार होत्या. परंतु त्यांनी या सभा रद्द केल्या आहेत. भाजपच्या विदर्भ संघटन मंत्र्यांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. प्रशासकीय कामांसाठी अमित शाह यांनी दौरा रद्द केला आहे. ते दिल्लीकडे रवाना झाल्याचे भाजपच्या संघटन मंत्र्यांनी म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.