दिल्लीत ईडीच्या पथकावर हल्ला, एक ताब्यात
नवी दिल्ली : खरा पंचनामा
सायबर फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिग प्रकरणातील छाप्यादरम्यान दिल्लीतील एका फार्महाऊसवर ईडीच्या पथकावर गुरुवारी हल्ला झाला. या हल्ल्यात एक अधिकारी जखमी झाला. या प्रकरणाबाबत दिल्ली पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार दिल्लीतील बिजवासन भागात घडला. पोलिसांनी सांगितले की, हे फार्महाऊस अशोक कुमार नावाच्या सीएचे आहे. या छाप्याचे नेतृत्व ईडीचे सहाय्यक संचालक सूरज यादव यांनी केले. ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका ईडी अधिकाऱ्याला (ईओ) या हल्ल्यात किरकोळ दुखापत झाली. मात्र, प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांनी छापेमारी सुरूच ठेवली. या छाप्यांचा उद्देश "संगठित" सायबर गुन्ह्यांवर आधारित मनी लाँडरिंग प्रकरणाचा तपास करणे होता. यात फिशिंग, क्यूआर कोड फसवणूक आणि पार्ट- टाइम जॉबचे आमिष दाखवून फसवणूक केली जात होती.
या छाप्यांत अनेक संशयास्पद साहित्य जप्त केले असून, यात अनेक पॅन कार्ड, बँक चेकबुक, पासबुक, पेन ड्राइव्ह, क्रेडिट व डेबिट कार्ड, शिक्के आणि सीपीयू यांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.