Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर...'

'साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर...'



सातारा : खरा पंचनामा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बिनधास्त विधानासाठी चांगलेच लोकप्रिय आहेत. जाहीर सभांमधून बोलत असताना ते कुणाचीही भीडभाड न ठेवता आपली मते मांडत असतात.

काही दिवसांपूर्वी तासगाव - कवठे महांकाळ येथे भाषण करत असताना अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्याबाबत विधान केले होते. आर. आर. पाटील यांनी माझी चौकशी करण्यासाठीच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती, असे ते म्हणाले. त्यानंतर आता साताऱ्यात जाहीर सभेत बोलत असताना अजित पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचा विजय पिपाणीमुळं झाला असल्याचे म्हटले आहे.

सातारा येथे जाहीर सभेत बोलत असताना अजित पवार म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत मविआने फेक नरेटिव्ह लोकांसमोर नेल्यामुळे महायुतीला फटका बसला. ४०० पारची घोषणा आणि संविधान बदलण्याच्या चर्चेमुळे मागासवर्गीय समाजाने महायुतीपासून पाठ फिरवली, अल्पसंख्याक समाजाला भीती दाखवली गेली. भाजपाची सत्ता आली तर सर्वांना पाकिस्तान-बांगलादेशमध्ये टाकणार असे बोलले गेले. त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून एकगठ्ठा मतदान केले. मी पहिल्यापासून अल्पसंख्याक समाजाला आधार आणि ताकद देण्याचे काम केले होते. पण तरीही त्यांनी आम्हाला बाजूला केले."

"आदिवासी समाजालाही आरक्षण संपण्याची भीती दाखवली गेली. आम्ही आमदारांना सांगितले की, देशाच्या राष्ट्रपती द्रौपद मुर्मू या आदिवासी समाजाच्या आहेत, हे लोकांना सांगा. पण विरोधक म्हणाले की, राष्ट्रपतींनाच संसदेच्या उद्घटानाला बोलावले नाही. विरोधकांनी कुठून कुठून मुद्दे काढले. आमची वाटच लावली. बारामतीत वाट लागली. माढ्यात वाट लागली", असे सांगून अजित पवार यांनी साताऱ्याचा किस्सा सांगितला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.