यवतमाळच्या सभेवेळी हेलिपॅडवर बॅग तपासली; उद्धव ठाकरे संतापले
यवतमाळ : खरा पंचनामा
उमेदवार घेऊन आलो पण आमदार घेऊन जाणार आहे. वणीचा आमदार मशालीचा पाहिजे. महाविकास आघाडी निवडून आणायचे आहे. प्रत्येक ठिकाणी विजय दिला असे सांगत आहे. 20 तारखेला डोळ्यावर पट्टी ठेऊ नका.
डोळसपणाने मतदान करा. मी माणसाला नाही यंत्रणेला दोष देत आहे. जे आपल्याला तपासत आहे त्यांचेही खिसे तपासा हा मतदारच अधिकार आहे. तपास अधिकाऱ्याचे ओळख तपास. माझी बॅग तपासली तशी मोदी शाहाची बॅग मिंधे, गुलाबी जॅकेत यांची बॅग तपासली टरबूज बॅग तपासली का?, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा टरबूज असा उल्लेख केला. लोकसभा निवडणुकीत मिंदे यांच्या बॅग चालल्या होत्या. मोकळ्या वातावरण निवडणूक व्हायला पाहिजे. ही लोकशाही असू शकत नाही. तुम्ही भाजपचे पंतप्रधान नाही देशाचे पंतप्रधान आहे. तुम्हाला संविधान बदलायचं आहे. मोदी शाह महाराष्ट्र येत आहे. अमित शाह 370 कलम काढले तेव्हा उद्धव ठाकरे सोबत होते. पण यांनी दिलेला शब्द पाळला नाही. मी लाथ मारली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सोयाबीन, कापसाला भाव मिळत आहे का? 370 कलम काढलं. पण पिकांना भाव नाही मिळाला. त्यांचा शेतकऱ्यांशी काही संबंध नाही. आपल्यारकडच्या कंपन्या गुजरात जात आहेत. आपल्या लोकांना किती नोकऱ्या मिळाल्या? अदानीला एअरपोर्ट वाढवण बंद देत आहेत. याला आम्ही विरोध करणारच आहे. वीज प्रकल्प अदानीकडे आहे, असा झालाय. नोकऱ्या गुजरातच्या लोकांना मिळत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.