Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एकाच मतदारसंघातून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राहुल गांधी यांनी केल मतदान!

एकाच मतदारसंघातून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राहुल गांधी यांनी केल मतदान!



पुणे : खरा पंचनामा

महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघात बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात एकूण 65 टक्के मतदान झालं. अनेक उमेदवारांचं भवितव्य हे आता मतपेटीत कैद झालं.

मात्र साऱ्या राज्यात एकाच विधानसभा मतदारसंघाची चर्चा रंगली आहे. राज्यातील एकाच मतदारसंघात नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राहुल गांधी यांनी मतदान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नक्की हा प्रकार कोणत्या मतदारसंघात घडला? हे आपण जाणून घेऊयात.

पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राहुल गांधी यांनी मतदान केलं. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. सत्ताधारी आणि विरोधककांकडून एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी आणि व्होट कापण्यासाठी नामसार्धम्य असलेले उमेदवार उभे केले जातात. त्याच प्रकारे शनिवारी नामसार्धम्य असलेल्या या नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राहुल गांधी यांनी मतदान केलं. काही वेळ या मतदारांच्या नावामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता. देशातील आणि राज्यातील प्रमुख नेत्यांची आणि या मतदारांची नाव थोडीफार सारखीच असल्याने काही वेळ खळबळ उडाली. मात्र त्यानंतर नामसाधर्म्य असल्याचं स्पष्ट झालं. 

कोथरुड मतदारसंघात नरेंद्र धीरजलाल मोदी, राहुल अनिल गांधी, शरद रामचंद्र पवार, अमित अशोक शहा, एकनाथ सोमनाथ शिंदे, अजित आत्माराम पवार, संजय एकनाथ राऊत, आदित्य प्रभाकर ठाकरे आणि रोहित राजेंद्र पवार हे मतदार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.