गहाळ झालेले १.१० लाखांचे मोबाईल नागरिकांना परत
विश्रामबाग पोलिसांची कामगिरी
सांगली : खरा पंचनामा
शहरातील विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणांहून गहाळ झालेले १.१० लाखांचे १० मोबाईल नागरिकांना परत देण्यात आले. विश्रामबाग पोलिसांनी ही कामगिरी केली.
नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून त्यांना ते परत देण्याच्या सूचना वरीष्ठ अधिकाऱ्यांनी विश्रामबागचे पोलिस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे यांना दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक कांबळे यांनी गहाळ मोबाईल शोधण्यासाठी एक विशेष पथक तयार केले होते. पथकाने गहाळ झालेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती काढून त्यांचा शोध घेतला. पथकाला दहा मोबाईल शोधण्यात यश आले.
पथकाने १.१० लाख रूपये किमतीचे मोबाईल शोधून ते पोलिस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे यांच्याहस्ते संबंधित नागरिकांना परत केले. पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. पोलिस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक चेतन माने, बिरोबा नरळे, अमर मोहिते, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, महमद मुलाणी, दीपाली नेटके, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, करण परदेशी, विवेक साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.