'बटेंगे तो कटेंगे'सह इतर विधाने रडारवर? केंद्रीय निवडणूक आयोगाने मागवला अहवाल
नवी दिल्ली : खरा पंचनामा
विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानांचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाने मागवला आहे. उद्या शनिवारी विधानसभेच्या 288 जागांचा निकाल लागणार आहे.
त्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचारात केलेली वादग्रस्त विधाने, धार्मिक व सामाजिक भावना दुखावलेली विधाने, धमकी, वाद या सगळ्यांचा अहवाल मागवला आहे. त्यामुळे भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या विधानावर कारवाई होणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. उद्या शनिवारी विधानसभेच्या 288 जागांचा निकाल लागणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीविरोधात महाविकास आघाडीने व तिसऱ्या आघाडीनेही जोरदार प्रचार केला होता. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडल्यानंतर आता विविध संस्था, मिडिया हाऊसने केलेले एक्झिट पोल समोर आले आहेत. अनेक संस्थांनी पुन्हा महायुती सरकार सत्तेत येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर काहींनी महाविकास आघाडी सत्तांतर करेल असेही अंदाज बांधले आहेत. या निवडणुकीत अपक्षांनाही चांगले दिवस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानांवर निवडणूक आयोग कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील वादग्रस्त विधान निवडणूक आयोगाच्या रडारवर आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी नुकताच या विधानांचा एक अहवाल मागवला आहे. यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान वापरण्यात आलेले वादग्रस्त विधानांचा अहवालांचा समावेश आला आहे. बटँगे तो कटेंगे तसेच एखाद्याला धमकी देणे, सामाजिक किंवा धार्मिक भावना भडकवणाऱ्या विधानांचाही अहवाल निवडणूक आयोगाने मागवला असल्याचे समजते.
येत्या 15 दिवसांत हा अहवाल द्यावा, अशा सूचना राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून आतापर्यंत 15 अहवाल पाठवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.