Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे वादात सापडले, न्यायालयाने बजावला समन्स

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे वादात सापडले, न्यायालयाने बजावला समन्स



मुंबई : खरा पंचनामा

मराठी आणि हिंदी दोन्हीही सिनेसृष्टीत प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. त्यांच्या वेगळ्या थाटणीच्या सिनेमांची छाप प्रेक्षकांच्या मनावर पडत असते. त्यामुळे प्रेक्षकही त्यांच्या सिनेमांना भरभरून प्रतिसाद देताना पहायला मिळतात. अशातच नागराज मंजुळेविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नागराज मंजुळे अडचणींत सापडले आहेत.

दिग्दर्शक नागराज मंजुळे वादात सापडले आहेत. त्यांचा आगामी सिनेमा 'खाशाबा' यामुळे ते अडचणीत आले आहेत. हा वाद नेमका काय आहे याविषयी अधिक जाणून घेऊया.

नागराज मंजुळे त्यांचा आगामी 'खाशाबा' घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र सिनेमा रिलीज आधीच ते वादात सापडले. या सिनेमाच्या कथेमुळे ते वादात आहेत. 'खाशाबा' सिनेमाची मूळ कथा लेखक संजय दुधाणे संदर्भात कोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी याप्रकरणी नागराज मंजुळेला समन्स पाठवला आहे.

संजय दुधाणे यांनी नागराज मंजुळेवर आणि जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन आणि ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे.

दरम्यान, नागराज मंजुळेचा आगामी 'खाशाबा' सिनेमा हा पैलवान खाशाबा जाधव यांचा बायोपिक आहे. मात्र खाशाबा जाधव यांच्या पुस्तकाचे अधिकार 2001 पासून लेखक संजय दुधाणे यांच्याकडे आहे. त्यामुळे आता या कथेवरून नागराज मंजुळे अडचणीत सापडले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.