महायुतीची झोप उडवणारा 'एबीपी माझा'चा पोल समोर
सोशल मीडियावर लोकांचा मूड काय?
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्राच्या महानिकालाला अवघा काहीच वेळ शिल्लक असताना आता सोशल मीडियावर त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. निकालाच्या दिवशी आलेल्या एक्झिट पोलमुळे अनेकांची झोप उडाल्याचं दिसून आलं.
आता तशीच झोप एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेण्यात आलेल्या पोलमुळे उडू शकते असं दिसतंय. एबीपी माझाच्या सोशल मीडियावर घेण्यात आलेल्या पोलमधून (ABP Majha Social Media Exit Poll) बहुसंख्य लोकांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
यूट्यूबवर आतापर्यंत 2 लाख 32 हजार लोकांनी आपला कल नोंदवला. त्यापैकी 63 टक्के लोकांनी महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचं सांगितलं. तर 32 टक्के लोकांनी महायुती सरकार सत्तेत येणार असं सांगितलं. उर्वरित पाच टक्के लोकांनी राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण होईल असं सांगितलं.
• महायुती : 32%
• महाविकास आघाडी : 63%
• त्रिशंकू : 5%
• एकूण मतं : 232K
फेसबूकवर एकूण 1024 लोकांनी आपला कल नोंदवला असून त्यापैकी 52 टक्के लोकांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असं म्हटलंय. तर 41 टक्के लोकांना महायुती सरकार सत्तेत येणार असं सांगितलं. सात टक्के लोकांना राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असं वाटतंय.
• महायुती : 41%
• महाविकास आघाडी : 52%
• त्रिशंकू : 7%
• एकूण मतं : 1024
इन्स्टाग्रामवर मात्र याच्या विरोधात कल असल्याचं दिसून आलं. इन्स्टाग्रामवर 22 हजार 714 लोकांनी आपला कल नोंदवला असून 49 लोकांनी राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येणार असल्याचं सांगितलं. तर 44 टक्के लोकांनी महाविकास आघाडी सरकार येईल असं सांगितलं. सात टक्के लोकांना राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असा कल नोंदवला.
• महायुती : 49%
• महाविकास आघाडी : 44%
• त्रिशंकू : 7%
• एकूण मतं : 22,714
ट्विटर म्हणजे आताच्या X प्लॅटफॉर्मवर लोकांनी महाविकास आघाडीकडे कल नोंदवला आहे. X वर 56.5 टक्के लोकांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असं सांगितलं. तर 30.2 टक्के लोकांनी महायुतीकडे कल नोंदवला. 13.3 टक्के लोकांनी राज्यात त्रिशंकू सरकार सत्तेत येईल असं म्हटलंय.
• महायुती : 30.2%
• महाविकास आघाडी : 56.5%
• त्रिशंकू : 13.3%
• एकूण मतं : 669
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.