शिंदेंच्या सभेनंतर सर्जिकल स्ट्राईक, भाजप पदाधिकाऱ्याला तडीपारीची नोटीस
कल्याण : खरा पंचनामा
डोंबिवली येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशातच आता कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर भाजप कार्यकर्त्याला तडीपारीची नोटीस देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याणमधील भाजप पदाधिकारी संदीप माळी यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. संदीप माळी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. सध्या निवडणुकीत संदीप माळी मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचा प्रचार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बुधवारी कल्याण ग्रामीण मतदार संघात प्रचार सभा घेतली. या सभेनंतर माळी यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या प्रकारे भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे तशी दुसऱ्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्याविरोधात का होत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपची कोंडी केली जात असल्याचीही चर्चा रंगली आहे.
बुधवारी (ता. 13, नोव्हेंबर) कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजेश मोरे यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी सभा घेतली. सभा संपल्यावर संदीप माळी यांच्या घरी रात्री दोन वाजता पोलीस पोहचले. त्यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. संदीप माळी हे रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. सध्या ते मनसे उमेदवार मनसे उमेदवार राजू पाटील यांचा प्रचार करीत होते. मनसे उमेदवाराचा प्रचार केल्याने माळी यांच्याविरोधात तडीपारीची नोटीस पाठवल्याचे स्पष्ट आहे. मात्र कल्याण पश्चिम आणि ग्रामीणमध्ये भाजपच्या विरोधात दबाब तंत्र वापरले गेले आहे. तोच प्रकार कल्याण पूर्वेत का वापरला जात नाही अशी चर्चा सुरु आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.