Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला

अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला



पुणे : खरा पंचनामा

विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या २० नोव्हेंबर रोजी समोर येणार आहेत. राज्यात महायुती की महाविकास आघाडी कोण मारणार बाजी याबाबत उद्या चित्र स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे, निकाल येण्याआधीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुख्यमंत्रिपदाचे पुण्यात फलक लावण्यात आला आहे. पण, काही वेळातच हे फलक काढण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

पुण्यात राष्ट्रवादीचे नेते संतोष नांगरे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले होते. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर 'विकासाचा वादा अजितदादा, मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असं लिहिण्यात आले होते. राजकीय वर्तुळात या बॅनरची चर्चा जोरदार सुरू होती. दरम्यान, आता हे बॅनर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीमध्ये अजूनही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. मात्र, आता निवडणुकीचे निकाल येण्यास काही तास बाकी असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भावी मुख्यमंत्रिपदाची फलक लावली जात आहेत.

पुण्यात लावण्यात आलेले बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण आता हे पोस्टर हटवण्यात आले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.