Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसांनाच 'डिजिटल अरेस्ट'! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार

पोलिसांनाच 'डिजिटल अरेस्ट'! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार



इंदूर : खरा पंचनामा

ऑनलाईन फसवणुकीसह 'डिजिटल अरेस्ट'चे वाढते प्रकार आज नित्याचे झाले आहेत. परंतु, रविवारी या गुन्हेगारांची 'वेळच वाईट' ठरली आणि त्यांनी केलेला कॉल थेट इंदूरच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश दंडोटिया यांना लागला.

तोही त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना. या डिजिटल गुन्हेगारांनी त्यांना क्रेडिट कार्डच्या गैरवापराच्या आरोपावरून दोन तासांत अंधेरी पश्चिम पोलिस ठाण्यात हजर होण्यासही सांगितले. अन्यथा बँक खाते ब्लॉक होईल, असा इशाराही दिला.

एवढ्यावर हा प्रकार थांबला नाही. इतक्या तातडीने हजर राहू शकत नसल्याचे दंडोटिया यांनी सांगितल्यावर हा कॉल पोलिस ठाण्यात जोडतो असे सांगत दुसऱ्याशी कॉल जोडून दिला. त्या व्यक्तीने वरिष्ठांशी बोलून व्हिडिओ कॉलद्वारे जवाब नोंदवता येतो का ते पाहतो म्हणत पुन्हा कॉल लावला आणि चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या वेशात दंडोटिया समोर दिसताच त्याची बोबडी वळली. त्याने हा व्हिडिओ कॉल लगेच कट केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.