सामाजिक कार्यकर्ते अशोक मासाळे यांच्या वाढदिनी विविध उपक्रमांचे आयोजन
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी, अण्णा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक मासाळे यांचा शुक्रवार दि. १३ डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा केला जात आहे. टिंबर एरियातील सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या श्री. मासाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री. मासाळे यांनी न्यू टिंबर एरिया, भीमनगर, प्रभाग क्र. १० मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. कॉंग्रेस पक्षासह अण्णा फौंडेशनतर्फे त्यांनी समाजातील गोरगरीब तसेच होतकरू विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक दहा येथील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शिवाय गरिबांना मदतीचे तसेच शालेय साहित्याचे वाटपही करण्यात येणार असल्याचे अण्णा फौंडेशनतर्फे सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.