पोलिसाच्या अंगावर घातली 'थार' !
शिक्रापूर : खरा पंचनामा
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापुर येथे वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाने थांबण्याचा इशारा केला असताना देखील भरधाव वेगाने थार कार पोलिसाच्या अंगावर घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, सदर घटनेत पोलिसाच्या पायावरून कारचे चाक गेल्याने पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे किरण जालिंदर बवले या कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक परिसरात पोलीस शिपाई ज्ञानदेव सोनवणे वाहतूक नियमनाचे काम करत असताना पुणे बाजूने विरुद्ध दिशेने एक काळ्या काचा व फॅन्सी नंबर असलेली थार कार आली दरम्यान पोलिसांनी त्या कार चालकाला थांबण्याच्या इशारा केला असता त्या कार चालकाने भरधाव वेगाने कार सोनवणे यांच्या अंगावर घातली, मात्र सोनवणे प्रसंगावधान राखून मागे सरकल्याने ते बाजूला पडले.
यावेळी कारचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने ते जखमी झाले, यावेळी कार चालकाने काच खाली घेऊन पुढे आला तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली, दरम्यान शेजारील नागरिक व पोलिसांनी कार चालकाला थांबवत त्याच्या जवळील एम एच १४ एल ए ३१३१ हि थार कार ताब्यात घेत पोलीस स्टेशन येथे आणले, याबाबत पोलीस शिपाई ज्ञानदेव बाळासाहेब सोनवणे (वय ५१, रा. स्वामी समर्थ नगर साठे वस्ती, लोहगाव, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी किरण जालिंदर बवले (वय २७, रा. वडगाव घेनंद ता. खेड जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याच्या जवळील थार कार जप्त करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर हे करत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.