बिहारमधील तीर्थक्षेत्रांचे संरक्षण, महामंडळाची स्थापना व्हावी : रावसाहेब पाटील
दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने बिहारचे राज्यपाल राजेंद्र आरळेकर यांना निवेदन
सांगली : खरा पंचनामा
जैन तीर्थंकरांची सर्वाधिक जन्मभूमी व तीर्थक्षेत्रे असलेल्या बिहार राज्यामध्ये महाराष्ट्राप्रमाणे जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे, क्षेत्र गिरनारवर होत असलेल्या अवैध अतिक्रमणासबंधी आपल्याकडून केंद्र सरकारला पत्र लिहावे. अशी परिस्थिती पुन्हा होवू नये यासाठी बिहारमधील सर्व तीर्थस्थळांचे संरक्षण आणि विकास व्हावा. त्यासाठी पुरातत्व विभागातर्फे जैन तीर्थक्षेत्राचे सर्वेक्षण आणि जैन प्रतिनिधींना सदस्यता मिळावी. तसेच दिगंबर जैन साधू-साध्विना विहारादरम्यान सुरक्षा मिळावी अशाप्रकारचे निवेदन दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन आणि महाराष्ट्र राज्य जैन आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य रावसाहेब जि. पाटील यांनी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले बिहारचे राज्यपाल राजेंद्र आरळेकर यांना दिले.
रावसाहेब जि. पाटील यांनी दक्षिण भारत जैन सभेच्या कार्याची ओळख करून देवून माननीय राज्यपाल महोदय यांचा सभेच्यावतीने पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. राज्यपाल यांनी या निवेदनावर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकारी यांनी बिहारला येण्याचे निमंत्रण देवून आपल्या निवेदनावर निश्चितपणे विचार करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपच्या नेत्या नीता केळकर, लठ्ठेचे ॲड. जयंत नवले, शितल पाटील आदि उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.