Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तीन पोलिस अधिकाऱ्यांना पाठवले सक्तीच्या रजेवर अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्षांचे आदेश

तीन पोलिस अधिकाऱ्यांना पाठवले सक्तीच्या रजेवर
अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्षांचे आदेश



परभणी : खरा पंचनामा

परभणीत संविधान शिल्पाची मोडतोड केल्यानंतर आंबेडकरी समाजाने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले होते. याप्रकरणी पोलिस प्रशासनाने दक्षत घेतली नसल्याची कबूली राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी परभणीत दिली आहे. तसेच या प्रकरणामधील जनतेचा रोष असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी बुधवारी परभणीत भेट दिली. यावेळी त्यांनी संविधान विटंबना घटनास्थळी भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनाही भेट दिली. यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन सर्व परिस्थीचा आढावा घेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पोलिसांवर जोरदार निशाणा साधला. पोलिसांनी ज्या पद्धतीने या प्रकरणात काळजी घ्यायला होती, ती घेण्यात आली नाही. तसेच ज्या तीन पोलिस अधिकाऱ्यांवर सामान्य जनतेचा रोष आहे त्यांनाही तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना ही विना एफआयआर मदत देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. परभणीमधील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार काही दिवसांपुर्वी समोर आला होता. त्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. संतप्त जमावाने एसटी बसवरही दगडफेक केली होती. दरम्यान या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर आता परभणीतील या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.