ईडी अधिकारी बनून सराफाच्या घरी छापा
गुजरात पोलिसांनी १२ जणांना केली अटक
भुज : खरा पंचनामा
चित्रपटातील प्रसंग वाटावा अशा रीतीने गुजरातमध्ये छापा घालण्यात आला. ईडीचे तोतया अधिकारी बनून काही जणांनी गांधीधाम येथे सराफाच्या पेढीवर व निवासस्थानी घातलेल्या छाप्यात २२.२५ लाख रुपयांची रोख रक्कम व दागिन्यांची चोरी केली होती.
तोतया ईडी अधिकाऱ्यांनी २ डिसेंबर रोजी ही छापा घातला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या सराफाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुजरात पोलिसांनी काही पथके तयार केली. पोलिसांनी भारत मोरवाडिया, देवायत खाचर, अब्दुल सत्तार मंजोठी, हितेश ठक्कर, विनोद चुडासामा, यूजीन डेव्हिड, आशिष, मिश्रा, चंद्रराज नायर, अजय डेबे, अमित मेहता यांच्यासह १२ जणांना अटक केली आहे.
भारत मोरवाडिया याला ईडीचे तोतया अधिकारी बनून छापा घालण्याची कल्पना सुचली. त्यानुसार कट आखण्यात आला. त्यांनी बनावट ओळखपत्रे तयार केली. २ डिसेंबर रोजी बनावट छापा घालून या सर्वांनी लाखो रुपयांची रोकड व दागिने चोरले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.