विजयस्तंभ अभिवादन दिनासाठी पोलिस प्रशासनाची तयारी सुरु
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती
वाघोली : खरा पंचनामा
विजयस्तंभ अभिवादनासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायींना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये यासाठी प्रत्येक विभागाने काळजीपूर्वक व कसून तयारी करावी, अशी सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिल्या आहेत. तसेच अभिवादन दिनाची तयारी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम तयारी आढवासाठी पोलीस प्रशासनासह इतर सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी विजयस्तंभावर भेट दिली. यानंतर झालेल्या बैठकीत संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्याकडून तयारी बाबत सर्व माहिती घेण्यात आली.
विजयस्तंभ सजावट, प्रवेश बॅरिकेट्स, रॅम्प, पार्किंग, वाहतूक नियोजन, विजयस्तंभ परिसर नियोजन, पाणी व्यवस्था, आरोग्य नियोजन, पी एम पी एल बसेस नियोजन आदी विषयांवर चर्चा झाली. कोणता विभाग कधी पासून काम करणार. कशाप्रकारे तयारी करणार, जागा ताब्यात आल्या की नाही. बसेसची व्यवस्था कशी असेल. आदी सर्व माहिती पोलीस प्रशासनाने जाणून घेतल्या.
या बैठकीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिम्मत जाधव, वाहतूक विभागाचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनावणे, शहर व ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, महावितरण, आरोग्य विभाग, बार्टी, पी एम पी एल, महसूल आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.