NTA आता केवळ उच्च शिक्षण संस्थांसाठी प्रवेश परीक्षा घेणार; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती
नवी दिल्ली : खरा पंचनामा
NTA entrance exams: NEET, JEE Main, CUET आणि UGC NET या महत्त्वाच्या परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA-National Testing Agency) कामकाजात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) नव्या वर्षापासून (2025) कोणतीही भरती परीक्षा घेणार नाही. एजन्सी केवळ उच्च शिक्षण प्रवेश परीक्षांवर लक्ष केंद्रित करेल, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी (17 डिसेंबर) दिली. सरकारला येत्या काळात कम्प्यूटर बेस्ड परीक्षा आणि टेक्नोलॉजी बेस्ड प्रवेश परीक्षेवर लक्ष केंद्रीत करायचे आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ची 2025 मध्ये पुनर्रचना करण्यात येईल, ज्यासाठी 10 नवीन पदे निर्माण केली जातील. तसेच, NEET-UG परीक्षा 'पेन-अँड-पेपर' पद्धतीने किंवा ऑनलाइन पद्धतीने घ्यायची याबाबत आरोग्य मंत्रालयाशी चर्चा सुरु असल्याचे प्रधान यांनी सांगितले.
मंत्रालयाशी चर्चा सुरु असल्याचे प्रधान यांनी सांगितले. देशात नवीन वर्षापासून बोर्डाच्या परीक्षांचा हंगाम सुरु होत आहे. बोर्डाच्या परीक्षेचा हंगाम म्हणजे तणावाचा हंगाम. हा ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित केला जातो, असेही त्यांनी पुढे सांगितले.
पत्रकार परिषदेदरम्यान प्रधान यांनी सांगितले की, "NTA मध्ये सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचा अहवाल आला आहे. कारवाईच्या अहवालाचा भाग म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयाला तो दिला आहे. हा अहवाल आजच सार्वजनिक होईल."
शिक्षणमंत्र्यांनी पुढे सांगितले की, ''NTA सध्या भरती परीक्षांसह विविध प्रकारच्या परीक्षा आयोजित करते. मात्र आता NTA विद्यापीठे आणि महाविद्यालयीन प्रवेश परीक्षा आयोजित करेल. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि अधिक कार्यक्षम प्रक्रिया सुनिश्चित करणे हा या बदलाचा उद्देश आहे."
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.