साताऱ्याच्या दोन मोटारसायकल चोरट्याना अटक : सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हे उघड
10.23 लाखांचा मुद्देमाल जप्त; इस्लामपूर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शहरातून मोटारसायकल चोरणाऱ्या साताऱ्यातील दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 10.23 लाखांच्या 23 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून तीनही जिल्ह्यातील 16 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.
जय संजय जाधव (वय 19), प्रथमेश दत्तात्रय गवते (वय 20, दोघेही रा. रविवार पेठ, कोष्टी गल्ली कराड, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मोटारसायकल चोरट्याना पकडण्याच्या सूचना इस्लामपूरचे पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी इस्लामपूर पोलिसांना दिल्या होत्या त्यानुसार निरीक्षक हारूगडे स्वतः शहरात पथकासह गस्त घालत होते. त्यावेळी दोन तरुण पेठनाका परिसरात विना क्रमांकाची मोटारसायकल घेऊन थांबल्याची माहिती त्यांना मिळाली.
पेठनाका येथे जाऊन त्यांनी दोघांकडे मोटारसायकलबाबत विचारणा केली. त्यावेळी दोघांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ती चोरल्याची कबुली दिली. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील काही शहरातून दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यांना अटक करून 23 दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच स्पेअर पार्टस, रंगवण्याचा स्प्रे, बॅटरी, ग्राईडर असे साहित्य जप्त करण्यात आले.
इस्लामपूरचे पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, शिवाजी यादव, विशाल पांगे, अमोल सावंत, दिपक घस्ते, शशिकांत शिंदे, सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे व विवेक सांळुखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.