विट्याजवळील एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उध्वस्त, गुजरातच्या मास्टर माईंडसह तिघांना अटक
29.73 कोटींचा माल जप्त, सांगली एलसीबीची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई : अधीक्षक घुगे
पहा व्हिडीओ
सांगली : खरा पंचनामा
विट्याजवळ असणाऱ्या कार्वे येथील औद्योगिक वसाहतीत गेल्या महिनाभरापासून अवैधरित्या सुरु असलेला एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जचा कारखाना सोमवारी मध्यरात्री उध्वस्त करण्यात आला. यावेळी ड्रग्ज तयार करणाऱ्या गुजरातच्या मास्टर माईंड तरुणासह तिघांना अटक करण्यात आली आहे. यावेळी तयार ड्रग्जसह, कच्चा माल, कार, अन्य साहित्य असा 29.73 कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे. सांगली एलसीबीने केलेली ही कारवाई पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी विटा येथे पत्रकार परिषदेत दिली.
रहुदिप धानजी बोरिचा (वय 41, रा. श्री रेसेडेन्सी, ररुम नं 22, उत्तीयादरा कोसंबा, ता. भरुच, जि. सुरत, गुजरात), सुलेमान जोहर शेख (वय 32, रा. मौलाना दादा लेन, दर्गाह गल्ली, बांद्रा, वेस्ट - मुंबई), बलराज अमर कातारी (वय २४, रा. साळशिंगे रोड, आयटीआय कॉलेज जवळ, विटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नशिले पदार्थ विक्री, निर्मिती, साठा, तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते.
पथकाला कार्वे (ता. खानापूर) येथील औद्योगिक वसाहतीत रामकृष्ण हरी माऊली या कारखान्यात एमडी ड्रग्जची निर्मिती होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी याची माहिती निरीक्षक शिंदे यांना दिली. श्री. शिंदे यांनी अधीक्षक घुगे यांच्या परवानगीने तेथे सोमवारी मध्यरात्री छापा टाकला.
त्यावेळी या कारखान्यात तयार एमडी ड्रग्ज सापडले तसेच ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालही सापडला. शिवाय एका कारमध्ये (एमएच 43 ए एन 1811) ड्रग्ज सापडले. पोलिसांनी ड्रग्जसह कच्चा माल, अन्य साहित्य असा 27.73 कोटींचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी तीनही संशयितांना अटक करण्यात आली. सोमवारी मध्यरात्री सुरु केलेली कारवाई मंगळवारी दुपारपर्यंत सुरु होती.
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाने एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, विट्याचे निरीक्षक धनंजय फडतरे, सहायक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, अच्युत सुर्यवंशी, सागर टिंगरे, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, सागर लवटे, अनिल कोळेकर, उदय साळुंखे, नागेश कांबळे, संजय पाटील, अमर नरळे, सतिश माने, महादेव नागणे, संदीप नलवडे, उदय माळी, विक्रम खोत, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, गणेश शिंदे, वनिता चव्हाण, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.