मंगळवेढा पोलीस ठाण्यातील दोन अंमलदारांना रंगेहात पकडले
गुन्ह्यात असलेले नाव कमी करण्यासाठी घेतले 5 लाख, सांगली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
मंगळवेढा : खरा पंचनामा
मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल असले अर्ज चौकशीवरून भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यात मधून यातील तक्रारदार यांचे आरोपी म्हणून असलेले नाव कमी करण्यासाठी 5 लाखांची लाच घेताना पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश राचप्पा कोळी (वय ४३) व पोलीस शिपाई वैभव रामचंद घायाळ (वय ३२) दोन्ही नेमणुक मंगळवेढा पोलीस ठाणे) यांना सांगली लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांचे आरोपी म्हणून असलेले नाव कमी करण्यासाठी, तसेच तक्रारदार यांचे इतर नातेवाईक यांना गुन्हयामध्ये अटकपूर्व जामीनसाठी आणि इतर सर्व सहकार्य करण्यासाठी 10 लाखांची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून सदर माहिती दिली होती. यावेळी तक्रारदाराकडून 5 लाखांची लाच स्वीकारताना महेश राचप्पा कोळी, वैभव रामचंद घायाळ यांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई सांगली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे, पोलीस अंमलदार ऋषीकेश बडणीकर, प्रितम चौगुले, अजित पाटील यांनी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.