"समोर दागिने होते, त्याने हातही लावला नाही"
मुंबई : खरा पंचनामा
अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात चोर शिरला आणि त्याने सैफवर जीवघेणा हल्ला केला. हल्ला झाला तेव्हा सैफबरोबर त्याची पत्नी करीना, दोन मुलं आणि त्यांना सांभाळणाऱ्या नॅनी होत्या.
सैफवर हल्ला झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी करीना कपूरचा जबाब नोंदवला. या जबाबात करीनाने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. हल्लेखोर आक्रमक होता पण त्याने घरातील काहीही चोरलं नाही, असं करीना म्हणाली.
वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी अभिनेत्री करीना कपूरचा पती बॉलीवूड स्टार सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तिचा जबाब नोंदवला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करीनाने आपल्या जबाबात पोलिसांना सांगितलं की, "जेव्हा आरोपी घरात घुसला तेव्हा तो खूप आक्रमक होता. पण त्याने घरातून काही चोरी केली नाही. जेव्हा सैफ चोरट्याशी लढत होता, तेव्हा तो आक्रमक होता. पण आमचं कुटुंब कसेतरी पळून इमारतीच्या 12 व्या मजल्यावर जाण्यात यशस्वी झालो."
पोलिसांनी सांगितले की, या घटनेमुळे करीना इतकी घाबरली की तिची बहीण करिश्मा कपूर तिला तिच्या घरी घेऊन गेली. करीना पुढे म्हणाली की, "तिचे काही दागिने समोरच्या खोलीत ठेवले होते, पण हल्लेखोराने त्याला हातही लावला नाही." चोराने सैफच्या घरातील कोणत्याही वस्तूची चोरी केली नाही हे करीनाच्या स्टेटमेन्टमधून स्पष्ट झालं मग आता चोर आला तरी कशासाठी होता? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सैफवर हल्ला होण्याच्या काही तास आधी करीना कपूर तिच्या मैत्रिणींबरोबर पार्टी करत होती. पार्टीचा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. सैफवर हल्ल्या होण्याआधी करीनानेच चोराला घरात पाहिलं होतं. चोराला सैफने पकडले तेव्हा करीना तैमूरला घेऊन खोलीत पळाली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.