राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक संतोष थोरात यांना पितृशोक
पोपट थोरात यांचे वृद्धापकाळाने निधन
सांगली : खरा पंचनामा
कर्नाळ (ता. मिरज) येथील राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक संतोष थोरात यांचे वडील पोपट महादेव थोरात (आण्णा) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 73 वर्षे होते. त्यांच्या निधनाने कर्नाळसह परिसरातील गावात शोक व्यक्त केला जात आहे.
पोपट (आण्णा) यांनी एसटी महामंडळात प्रदीर्घ काळ सेवा बजावून ते सेवानिवृत्त झाले हॊते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन विधी गुरुवार दि. 16 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कर्नाळ येथे होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.