डिपार्टमेंट नको, साहेब पीए करा; अधिकाऱ्यांची मंत्रालयात बदलीसाठी तोबा गर्दी
मुंबई : खरा पंचनामा
नव्या मंत्र्यांसोबत काम करण्यासाठी राज्यभरातल्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात जोरदार फिल्डिंग लावायला सुरूवात केलीय. कारण मंत्र्याकडे वजनदार फाईली येत असतात आणि त्यामुळे अधिकाऱ्यांचंही वजन वाढतं. हे चांगलंच ठाऊक असल्यामुळेच आपला मूळ विभाग सोडण्यासाठी अधिकारी नवे नवे फंडे वापरत आहेत.
कॅबिनेट मंत्र्यांकडे पीए, पीएस, ओएसडी मिळून १५ तर राज्यमंत्र्यांकडे १३ जण असतील असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढलेला आहे. उसनवारीवर घ्यावयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे उसनवारीवर किती अधिकाऱ्यांना घ्यायचे याचे बंधन मंत्री कार्यालयावर नाही. याचा फायदा घेत अनेकांना उसनवारीवर घेतले जातंय. एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याने ५० अधिकाऱ्यांना उसनवारीवर घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रालयातीलच नव्हे तर राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमधल्या अधिकाऱ्यांमध्येही मंत्र्यांचा पीए होण्यासाठी चढाओढ सुरू आहे. एकेका मंत्र्याकडे तब्बल १०-१० अधिकाऱ्यांचे अर्ज आले आहेत. या अधिकाऱ्यांना मंत्र्याकडे बदली झाल्यानंतरही आपल्या मूळ विभागात असलेलाच पगार आणि भत्ते मिळतात.
मात्र मंत्र्यांकडील टेबलाखालच्या कमाईचा हिशोब न विचारलेलाच बरा आणि त्यामुळेच मंत्रीसाहेबांचा पीए होण्यात सर्वांना अधिक रस आहे. सुट-बूट तर सर्वच अधिकाऱ्यांकडे असतात... मात्र सर्वात मोठा वट असतो तो मंत्रीसाहेबांच्या पीएचाच.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.