Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द

वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द



बीड : खरा पंचनामा 

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणावरुन वादंग उठल्यानतंर खंडणीप्रकरणात आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर सीआयडीच्या विशेष पथकाकडे त्याचा ताबा देण्यात आला असून गृहमंत्र्यांनी सीआयडी पोलिसांना सक्त ताकीद दिली आहे.

कोणालाही दयामाया दाखवू नका, याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर, आरोपी वाल्मिक करडावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, वाल्मिक कराडच्या अडचणी वाढत असून वाल्मिकला 24 तासांत तिसरा धक्का देण्यात आलाय. वाल्मिक कराडच्या केजमधील वाईन शॉपसाठी देण्यात आलेलं ना हरकत प्रमाणपत्र आता रद्द करण्यात आलंय. दरम्यान, खंडणीप्रकरणी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपी वाल्मिकला सीआयडी पोलिसांना मकोका अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक केली आहे.

वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर परळीत कराड समर्थकांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर, परळी बंदचीही हाक देण्यात आली आहे. त्यामुळे, एकीकडे वाल्मिक कराडवर एसआयटी व सीआयडीकडून कारवाईचा बडगा उगारला जात असताना दुसरीकडे त्याचे समर्थक आंदोलनाच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यामुळेच, आज आरोपीला केज ऐवजी बीड न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत वाल्मिक कराडवर तिसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीआयडी पोलिसांनी वाल्मिकरवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करुन पहिला मोठा धक्का दिला. त्यानंतर, पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली. वाल्मिक कराडच्या या अलिशान फ्लॅटचा ताबा घेण्यात आला असून लवकरच लिलाव होणार असल्याची माहिती आहे. मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी ही कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे फ्लॅट जप्तीचा हा दुसरा धक्का आहे.

वाल्मिक कराडला आता आणखी एक धक्का देण्यात आला आहे. केज नगर पंचायतने वाल्मिक कराडच्या वाईन शॉपला दिलेले ना हरकात प्रमाणपत्र रद्द केले आहे. वाल्मीक कराड ने केज शहरांमध्ये एक वाईन शॉप विकत घेतले होते आणि हे वाईन शॉप विकत घेताना बेकायदेशीररित्या केज नगरपंचायतकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला होता. त्यानंतर, नगर पंयायतीने या वाईन शॉपचे लायसन्साठी दिलेले ना हरकात प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यामुळे, वाल्मिकला हा तिसरा धक्का असून 24 तासांत तीन मोठ्या कारवाया त्याच्यावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.