Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चेन स्नॅचिंग करणाऱ्यास अटक, 1.85 लाखांचा मुद्देमाल जप्त सांगली, कोल्हापुरातील गुन्हे उघड; एलसीबीची कारवाई

चेन स्नॅचिंग करणाऱ्यास अटक, 1.85 लाखांचा मुद्देमाल जप्त 
सांगली, कोल्हापुरातील गुन्हे उघड; एलसीबीची कारवाई 



सांगली : खरा पंचनामा 

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सांगली, कोल्हापूर येथील दोन गुन्हे उघडकीस आणून 1.85 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.

अमित दत्तात्रय वायदंडे (वय २६, रा. इटकरे, ता वाळवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चोरीतील गुन्हेगारांना शोधण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक तयार केले होते. पथक शोध घेत असताना एकजण विना क्रमांकाची दुचाकी घेऊन एक तरुण संशयस्पदरित्या सांगलीवाडी येथील टोल नाक्याजवळ थांबल्याची माहिती मिळाली.

पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यावर त्याने ती कोल्हापूर येथून चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या खिशात सापडलेल्या दागिण्याबाबत चौकशी केल्यावर ते सांगली येथील अभयनगर येथे घराबाहेर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातून हिसडा मारून नेल्याची कबुली दिली. त्याला अटक करून संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक कुमार पाटील, अरूण पाटील, अतुल माने, कुबेर खोत, सचिन धोत्रे, नागेश कांबळे, सुशिल मस्के, श्रीधर बागडी, विनायक सुतार, ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी, सुरज थोरात, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.