आयपीएस अधिकाऱ्याचा पतीने केली घर मिळवून देण्याच्या नावाखाली 25 कोटींची फसवणूक
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईत एका आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीने घर मिळवून देण्याच्या नावाखाली व्यवसायिकाची 25 कोटींची फसवणूक केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मुंबई पोलिसांच्या पथकाने कुलाबा येथील अधिकाऱ्याच्या निवासस्थानाचीही झडती घेतली. पुरुषोत्तम प्रभाकर चव्हाण असे या आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीचे नाव आहे.
चव्हाण यांच्यावर शासकीय कोट्यातून घर देण्याचे सांगून एका व्यवसायिकाला गंडावले आहे. चव्हाण सह आणखी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लोकांनी चव्हाण यांना बनावट कागदपत्रे तयार करण्यात मदत केली.
57 वर्षीय पीड़ित व्यावसायिक यांनी फसवणुकीची तक्रार केल्यावर ही बाब उघडकीस आली. तक्रारदार हे शीव परिसरात वास्तव्यास आहे. चव्हाण यांना ते 2019 पासून ओळखत होते. चव्हाण यांनी दादर, ठाणे, परळ आणि पुणे येथे भूखंड आणि घरे विकण्याच्या बहाण्याने 24 कोटी 78 लाख रुपयांची फसवणूक केली. एफआयआरनुसार, चव्हाणने फसवणूक करून इतर आरोपींच्या खात्यातून पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.