जोर मारण्याच्या स्पर्धेत शुभम चव्हाण प्रथम; दहा मिनिटात मारले 281 जोर
श्री समर्थ व्यायाम शाळेत दास नवमी उत्साहात साजरी
सांगली : खरा पंचनामा
गेली 60 वर्षाहून अधिक काळापासून श्री समर्थ व्यायाम शाळा येथे दास नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दास नवमी निमित्त जोर मारण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
आधुनिक व्यायामाच्या युगात पूर्वीपासून चालत आलेला व्यायाम प्रकार जोर, बैठका, सपाट्या, गदा, खोरे असे शिवकाळापासून चालत आलेल्या व्यायाम प्रकाराच्या प्रसाराच्या दृष्टीने श्री समर्थ व्यायाम शाळेच्या वतीने अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सकाळ सत्रात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभाग प्रमुख अंकुश जाधव यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या जोर स्पर्धा मोठा गट व लहान गट अशा दोन गटात पार पडल्या,जोर स्पर्धेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सांगलीवाडी, सरकारी तालीम, श्री समर्थ व्यायाम शाळा येथील जोरपट्टूंनी स्पर्धेत सहभाग घेतला.
सायंकाळ सत्रात ब्रह्मवृंद मंत्र जागर होऊन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला, मोठ्या गटात शुभम चव्हाण याने दहा मिनिटात 281 जोर मारून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक संतोष तांबट 261, तृतीय क्रमांक सौरभ यादव 236, चतुर्थ क्रमांक चंद्रकांत पाटणकर 152 (वय 68). लहान गटात प्रथमेश पडोळकर यांनी पाच मिनिटात 168 जोर मारून प्रथम क्रमांक पटकाविला, द्वितीय क्रमांक आयुष गायकवाड 155, तृतीय क्रमांक अथर्व पाटील 106, चतुर्थ क्रमांक शिवांश पाटील 65 (वय6).
आमदार सुधीर गाडगीळ तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे सचिव आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव पंच रामकृष्ण चितळे यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन, स्वागत व प्रास्ताविक केले, रमेश गोवंडे यांनी आभार मानले,
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गुरुनाथ कुलकर्णी, बापू हरिदास, डॉक्टर पुरंदरे, हरी महाबळ, वैभव माईणकर, वैभव केळकर, रविंद्र वादवणे, नंदु रिसवडे, उदय बेलवलकर, शाम वैद्य,विलास गद्रे, प्रदीप तेरवाडकर, बंडोपंत पाटणकर उपस्थित होते
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.