'हा माणूस बोलण्यासाठी 50 लाख घेतो..'
करूणा शर्माचा सदावर्तेवर गंभीर आरोप
मुंबई : खरा पंचनामा
आपल्या मुलांना त्रास दिला तर कोण कशाची दलाली करत होतं ते सर्व बाहेर काढू असा इशारा करुणा मुंडे यांनी दिलाय. दुसरीकडे सदावर्ते सारखे लोकं फक्त बोलण्यासाठी पन्नास लाख घेतात असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. मुलावर दबाव आणाल तर माझ्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढेन असा इशारा करुणा मुंडेनी धनंजय मुंडेंना दिलाय. त्यावर धमक्या देण्याऐवजी काय असेल ते उघड करावं असं आवाहन सत्ताधारी यांपैकीच काही नेत्यांनी केले. तर दुसरं म्हणजे सदावर्ते हा माझ्यासाठी वकील नाही.
हा माणूस फक्त बोलण्यासाठी पन्नास पन्नास लाख रुपये घेतो असा गंभीर आरोपही करुणा मुंडेनी सदावर्तेवर केलाय. 'सदावर्ते जे वकील आहे ते माझ्यासाठी वकील पण नाहीये. जेव्हा माझ्या गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर टाकली गेली होती. माझे लोक त्यांच्याकडे गेले होते... त्यावेळी देखील धनंजय मुंडे मंत्री होते.
त्यांना सांगितलं तुम्ही केस लढा तर फक्त बोलण्यासाठी ते पन्नास लाख रूपये मागायचे. अशा लोकांना मी वकील मानत नाही. लोकं खोटं बोलण्यासाठी ५० लाख रूपये मागताय, असं म्हणत करूणा शर्मा यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर माझ्या वकिलांनी एक पण रूपया घेतला नाही त्यांचे आभार मी मानू नको का? असा सवालही करूणा मुंडेंनी केलाय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.