वाळू माफीयांशी साटेलोटे करणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित
बीड : खरा पंचनामा
अवैध वाळू उपसा केल्या प्रकरणी आरोपींशी साटे लोटे करणाऱ्या बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बीडचे नवनियुक्त पोलीस अधिक्षक नवनीत कावंत यांनी ही कारवाई केली आहे. गेवराई पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अधिकची माहिती अशी की, सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे या दोघांनी वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाईचे आदेश असताना वाळूसह गाडी ताब्यात न घेता फक्त वाहन ठाण्यात आणून लावले. शिवाय गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब केला. हा प्रकार म्हणजे आरोपींना सहकार्य करण्यासारखा होता. यामुळे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी बलाराम सुतार आणि अशोक हंबर्डे या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यातील वातावरण तापलं होतं. महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या बदलीची घोषणा केली होती. त्यानंतर नवनीत कांवत यांच्याकडे बीडच्या पोलीस अधिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आज नवनीत कावंत यांनी मोठी कारवाई केल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बीडमध्ये वाळू माफिया, खंडणी अशा गुन्ह्यांची चर्चा आहे. त्यातच वाळू माफियांचा मुद्दा देखील चांगलाच तापलेला पाहायला मिळतोय. त्यानंतर अवैध वाळू उपसा केल्याच्या प्रकरणातील आरोपींशी साटे लोटे करणाऱ्या बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केली.. गेवराई पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांचा यामध्ये समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.