'आता पुढची लढाई कोर्टात', शिवराज राक्षेने थोपटले दंड !
अहिल्यानगर : खरा पंचनामा
अहिल्यानगरमध्ये 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. यावेळी पैलवान आणि नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांना निकाल न पटल्याने त्यांनी पंचाला लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याशिवाय दुसऱ्या लढतीदरम्यान महेंद्र गायकवाड यांनी ब्रेकमध्ये पंचांशी वाद घातला. आणि निघून गेले. यानंतर दोघांवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान शिवराज राक्षे यांने या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. मी हरलो नाही. माझी पाठ टेकली नव्हती. तरीही मला अपयशी ठरविण्यात आलं. स्पष्टता यावी यासाठी मी तेव्हाच पंचांकडे रिव्हूयची मागणी करीत होता. मात्र कोणीच आमचं ऐकून घेत नव्हते. पंचांकडून उडवा उडवीची उत्तरं दिली जात होती. पंचांनी रिव्हूयसाठी पुढे पाठवलं असतं तर थर्ड अम्पायरनी व्हिडिओ पाहून निर्णय घेतला असता. मात्र पंचांची रिव्हूयसाठीही परवानगी दिली नाही, असं शिवराज राक्षे यांनी सांगितलं. दरम्यान काका पवार यांच्या तालमीतील पैलवानांवर अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सद्यपरिस्थितीत काका पवार यांच्या तालमीतील चार पैलवानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान सोशल मीडियावर शिवराज राक्षे याने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याशिवाय शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील लढतीचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिवराज राक्षे याची पाठ जमिनीला टेकली नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे हा सामना हरला नसल्याचा दावा राक्षेकडून केला जात आहे. इथं जर न्याय मिळाला नाही तर कोर्टात जाणार असल्याचं शिवराज राक्षे यावेळी म्हणाले. पंचांना चुकीचा निर्णय द्यायला एक मिनिट लागतो, मात्र पैलवान वर्षानुवर्षे मेहनत करुन तयारी करीत असतो, असंही राक्षे यावेळी म्हणाले.
शिवराज राक्षे यांनी पंचाची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. राक्षे यांनी सांगितल्यानुसार, मी बोलत असताना पंचातील एकाने मला शिवी दिली. त्यामुळे रागाच्या भरात माझ्याकडून ते कृत्य घडल्याचं राक्षे यांनी सांगितलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.