सोलापूर विकास आराखड्यात साताऱ्याच्या जलमंदिराचा समावेश!
सोलापूर : खरा पंचनामा
सोलापूर महापालिका प्रशासनाने नव्या सुधारित विकास योजनेचा प्रारूप आराखडा (डीपी) तयार करताना सातारा शहराची कॉपी केली आहे. महापालिका प्रशासनाचा हा अजब कारभार समोर आला आहे. सोलापूरच्या या आराखड्यात अजिंक्यतारा फोर्ट, जलमंदिर राजवाडा, चार भिंती, बदामी- विहीर आदी गोष्टींचा समावेश आहे.
त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी आणि आराखडा रद्द करावा; अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे केली आहे.
सोलापूर महापालिकेच्या विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यावर हरकत घेण्यासाठी ३१ जानेवारी शेवटचा दिवस होता. या आराखड्यावर दोन हजाराहून अधिक हरकती आल्या आहेत. यात भाजप शहराध्यक्षांनी तर थेट हा आराखडा रद्द करावा, अशी मागणी केली आहे. महापालिका आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना अपेक्षित असलेला आराखडा तयार केलेला नाही. चुकीची लोकसंख्या दाखवून आराखडा तयार केल्याचा आरोप केला आहे.
हद्दवाढ भागात सार्वजनिक उद्याने, नाट्यगृह, क्रीडांगणे, हॉस्पिटल, शाळा, वाहनतळ अशा अनेक सुविधांची गरज आहे. आराखड्यात याचा कोणताही विचार झालेला नाही. तर सोलापूर शहरात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे; हे सांगताना आराखड्यातील पान क्र. २५३ वर अजिंक्यतारा किल्ला, जलमंदिर, चार भिंती, बदामी विहीर आहे असे नमूद केले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी कॉपी पेस्ट केल्याचे दिसून येत असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान सोलापूर महापालिकेने तयार केलेल्या आराखड्यावर भाजपचे शहराध्यक्ष निलेश काळे यांनी आक्षेप घेतला असून आराखडा कॉपी पेस्ट करणाऱ्या सर्वांवर कारवाई होऊन आराखडा रद्द करावा, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. याशिवाय याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याची माहिती नरेंद्र काळे यांनी दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.