लक्षात ठेवा आपण शपथ घेतलीये, नाहीतर कारवाई करेन!
मुंबई : खरा पंचनामा
राज्य मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी संपन्न झाली. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देण्याकरिता मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांना सामोरे गेले. परंतु यावेळी फडणवीस काही मंत्र्यांवर संतापलेले पाहायला मिळाले.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याआधीच काही मंत्र्यांच्या कार्यालयाकडून संबंधित निर्णयांसंबंधी आधीच माहिती सांगितली जात असल्याचा मुद्दा प्रकर्षाने समोर येत होता. याच मुद्द्यावरून फडणवीस यांनी मंत्र्यांना झापले.
अलीकडच्या काळात कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतात. ही चुकीची पद्धती आहे. मी मंत्र्यांनाही सांगितलं, आपापल्या कार्यालयांना सांगा, कॅबिनेटचा अजेंडा पूर्णपणे गुप्त असतो, अशा शब्दात त्यांनी संबंधित मंत्र्यांना खडसावले.
तसेच यावेळी त्यांनी मंत्र्यांना गोपनीयतेच्या शपथेची आठवणही करून दिली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याआधी कोणतीही माहिती उघड करायची नसते, हा नियम आहे. त्यासाठीच आपण गोपनीयतेची शपथ घेतो. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय सांगणे यात लपवण्यासारखं काही नाही. पण बैठकीआधी ते लीक करू नयेत, हा नियम आहेत. तो नियम आहे तो पाळलाच पाहिजे. नाहीतर मी संबंधित मंत्र्यांवर कारवाई करेन, असा इशारा त्यांनी मंत्र्यांना दिला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.