Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मणिपूर हिंसाचाराच्या दीड वर्षांनंतर मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा

मणिपूर हिंसाचाराच्या दीड वर्षांनंतर मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा



दिल्ली : खरा पंचनामा 

एन. बिरेन सिंह मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. रविवारी (9 फेब्रुवारी) संध्याकाळी एन. बिरेन सिंह यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे राजीनामा सादर केला.

मणिपूरच्या मुख्यमंत्री कार्यालयातील बिरेन सिंह यांचे वैयक्तिक सहाय्यक दीपक शिजागुरुमायुम यांनी राजीनाम्याच्या वृत्ताबाबत दुजोरा दिला. दीपाक शिजागुरुमायुम म्हणाले, "मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी संध्याकाळी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला आहे."

बीबीसीचे सहयोगी पत्रकार दिलीप कुमार शर्मा यांनीही बिरेन सिंह यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.