पत्नीच्या मृत्युंनंतर अंकली पुलावरून उडी मारून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
इचलकरंजीतील जखमीवर सांगली सिव्हिलमध्ये उपचार सुरु
सांगली : खरा पंचनामा
विषारी औषध प्राशन केल्याने इचलकरंजी येथील विवाहितेचा आज उपचारदरम्यान येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूमुळे नैराश्याने ग्रासलेल्या पतीने अंकली येथील कृष्णा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुपवाड येथील आयुष हेल्प लाईन टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पतीचे प्राण वाचवले पण यात गंभीर जखमी झालेल्या पतीवर सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
राखी संपत शिकलगार (वय ४१ रा. वेताळपेठ परिसर, इचलकरंजी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर संपत असे जखमीचे नाव आहे. संपत आणि राखी यांचे कुटुंब इचलकरंजी येथील वेताळपेठ परिसरात राहते. मंगळवारी (ता.25) राखी यांनी काहीतरी विषारी औषध प्राशन केले. कुटुंबियांनी त्यांना तातडीने आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
मात्र गेल्या दोन दिवसापासून त्यांच्यावर सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. आज गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान राखी यांनी अखेरचा श्वास घेतला. संपत दोन दिवस पत्नीची जिवापाड सेवा करत होते. मात्र पत्नीच्या जाण्याने संपत यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. अस्वस्थ बनलेले संपत इचलकरंजीकडे जाण्यासाठी त्यांनी रिक्षा केली. ते अंकली पुलावर पोहोचले आणि तिथेच त्यांनी रिक्षा थांबवली. एका क्षणात त्यांनी थेट पुलावरून नदीत उडी घेतली.
रिक्षाचालकासह नागरिकांनी सांगलीच्या आयुष्य हेल्पलाईन टिमने तातडीने संपत यांना नदीतून बाहेर काढले. या घटनेत पायाला इजा झाल्याने संपत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.