पोलिस मुख्यालयातील बालवाडीत संस्कारमय विद्यार्थी घडतील : महानिरीक्षक फुलारी
अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत कृष्णा मॅरेज हॉल, बालवाडी नूतनीकरणाचे उदघाटन
सांगली : खरा पंचनामा
बालवाडी ही हसत-खेळत शिक्षणाची सुरुवात असते. बालकांवर चांगले संस्कार झाले तर भविष्यात तो उत्कृष्ट नागरिक होण्यास मदत होते. पोलिस मुख्यालयातील बालवाडीमधून संस्कारमय विद्यार्थी बाहेर पडतील असा विश्वास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी व्यक्त केला.
पोलिस मुख्यालयात पोलिस कल्याण अंतर्गत बालवाडीच्या नूतनीकरणाचे तसेच कृष्णा मॅरेज हॉलच्या नूतनीकरणाचे उदघाटन महानिरीक्षक फुलारी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना फुलारी यांच्याहस्ते झाले. यावेळी श्री. फुलारी बोलत होते. ते म्हणाले, कृष्णा मॅरेज हॉलच्या नूतनीकरणामुळे पोलिस अधिकारी, अंमलदार तसेच इतर नागरिकांना विविध कार्यक्रम घेण्यासाठी उपयोग होईल. यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, कृष्णा मॅरेज हॉल भविष्यात मल्टीपर्पज हॉलसारखा नावारूपास येईल. मुख्यालयातील बालवाडीला लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून आवश्यक ते साहित्यही पुरवण्यात येईल असेही आश्वासन श्री. घुगे यांनी दिले.
यावेळी श्रीमती वंदना फुलारी, श्रीमती शीतल संदीप घुगे यांच्याहस्ते बालवाडीच्या मुलांना खाऊवाटप करण्यात आले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक रितू खोकर, सांगली शहरच्या उपअधीक्षक विमला एम., पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) दादासाहेब चुडाप्पा यांच्यासह अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.