Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फडणवीसांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंची आर्थिक कोंडी, तक्रार करायला पहाटे अमित शाहांना भेटले सामनामधून दावा

फडणवीसांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंची आर्थिक कोंडी, तक्रार करायला पहाटे अमित शाहांना भेटले 
सामनामधून दावा 



मुंबई : खरा पंचनामा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील फिक्सर आणि दलालांचे पीक कापण्याचे ठरवले आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्रात घाण करणाऱ्या या सर्व गटारांची सफाई करण्याचे ठरवल्याने एकनाथ शिंदे यांचे मुख्य कलेक्टर आशर प्रा. लि. हे दहा हजार कोटी रुपये घेऊन दुबईत पळाले आहेत, असा सनसनाटी आरोप शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले आहे. दलाल आणि फिक्सरांचे पीक कापण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन, पण त्यांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही. कारण पिकावरचा दाढीवाला खोडकिडा म्हणतोय, "मला हलक्यात घेऊ नका." फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल, असे 'सामना'त म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यकारभारात शिस्त आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. मागच्या तीन वर्षांत भ्रष्टाचाराचा धबधबा वाहत होता. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्याचे राजकारण कुजले. आर्थिक बेशिस्तीने टोक गाठले. आमदार, खासदार, नगरसेवक, खऱ्या शिवसेनेचे पदाधिकारी यांना विकत घेण्यासाठी व नंतर पोसण्यासाठी लागणारा पैसा रस्ते, बांधकाम ठेकेदार, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा, एसआरए, नगरविकास खात्याची लूट करूनच जमा केला गेला. हा लुटीचा पैसा आपल्या खिशात पडावा यासाठी

अनेकांनी पक्षांतरे केली. पैशांचा हा प्रवाह आला कोठून, तर बेकायदेशीर टेंडर्स, बनावट कामे, निधीवाटपातील कमिशनबाजी, भूखंड घोटाळे, गृहनिर्माणातील दलाली या 'आशर' मार्गाने हा पैसा जमा झाला. शिंद्यांचे मुख्य कलेक्टर आशर प्रा. लि. हे दहा हजार कोटी रुपये घेऊन दुबईत पळाले आहेत, अशी ताजी खबर असल्याचा दावा 'सामना'तून करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.