सराईत गुन्हेगारांसाठी वकिलांनीच बनवली बनावट जामीनदारांची टोळी!
दोन वकिलांसह त्यांच्या चार साथीदारांना अटक
पुणे : खरा पंचनामा
सराईत गुन्हेगारांना जामीनदार मिळत नाहीत पण पैसा मोठा मिळतो मग अशा गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी वकीलच गुन्हेगार बनले. दोन वकिलांनी चक्क बनावट जामीनदारांचीच टोळी केली. पुणे पोलिसांनी ही साखळी उध्वस्त केली आहे.
या प्रकरणात वैदवाडी हडपसर येथे राहणारा अस्लम गफूर सय्यद व योगेश सुरेश जाधव या दोन वकिलांना पोलिसांनी अटक केली आहे, तर त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणारे त्यांचे साथीदार दर्शन अशोक शहा, पिराजी उर्फ चंद्रकांत मारुती शिंदे, गोपाळ पुंडलिक कांगणे व संतोषकुमार शंकर तेलंग यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
सय्यद व जाधव हे दोघेजण कोर्टाकडून सराईत गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्याचा करत होते, तर हे सर्व रॅकेट हे जामीनदारांचे आधार कार्ड, रेशन कार्ड व ऑनलाईन सातबारा उतारे हे बनावट तयार करून त्यावर बदल करायचे. शिधापत्रिका खरी वाटावी म्हणून पुरवठा विभागाच्या उपायुक्त यांचा बनावट रबरी स्टॅम्प तयार करून त्यावर खोटी सही मारायचे. ही प्रतिज्ञापत्र तयार करून सहाय्यक अधीक्षकामार्फत बनावट कागदपत्रांची खरी पडताळणी करून घ्यायचे आणि अशाद्वारे अनेक सराईत गुन्हेगारांना त्यांनी आतापर्यंत जामीन मिळवून दिला.
दरम्यान या रॅकेटची माहिती पोलिसांना समजली. वानवडी पोलिसांनी एक तपास पथक तयार केले. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने संपूर्ण माहिती घेतली. चौकशी केली व लष्कर कोर्टाच्या आवारातून बनावट जामीनदारांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे तपास सुरू केला. त्यावरून त्यातील मुख्य आरोपी दर्शन शहा हा असल्याचे समोर आले आणि त्यानंतर दोन वकील यामध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाली.
हेच वकील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती कबुली संतोष कुमार तेलंग याने न्यायालयात दिली. दरम्यान यामध्ये न्यायालयातील न्यायालयातील कर्मचारी देखील सहभागी आहेत का हे पोलीस आता तपासत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार धनाजी टोणे करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.