कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी गुरुवारपासून सांगली दौऱ्यावर
नागरिकांनाही भेटणार, वार्षिक तपासणीसाठी पाच दिवसांचा कार्यक्रम
सांगली : खरा पंचनामा
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी गुरूवारपासून पाच दिवस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या वार्षिक तपासणीसाठी ते सांगलीत येत आहेत. यावेळी ज्या नागरिकांना महानिरीक्षक फुलारी यांना भेटायचे आहे त्यांनी संबंधित पोलिस ठाण्यात कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री. फुलारी गुरुवारी सांगली शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालय तसेच मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात तपासणीसाठी येणार आहेत. शुक्रवारी तासगाव उपअधीक्षक कार्यालय तसेच तासगाव पोलिस ठाणे येथे तर शनिवारी कवठेमहांकाळ आणि आटपाडी पोलिस ठाण्याची तपासणी करणार आहेत. रविवारी पोलिस मुख्यालयात ते उपस्थित असणार आहेत. सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय, मिरज शहर वाहतूक शाखा आणि सांगली शहर वाहतूक शाखा येथे तपासणीसाठी उपस्थित राहणार आहेत.
या कालावधीत ज्या नागरिकांना महानिरीक्षक श्री. फुलारी यांना भेटावयाचे आहे त्यांनी संबंधित पोलिस ठाणे किंवा पोलिस उपअधीक्षक कार्यालय येथे आपली नावे अगोदर कळवावीत. त्यानंतर नागरिकांना भेटीची वेळ आणि ठिकाण कळवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.