राज्यातील 496 अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती
सांगलीतील १२, सातारा, कोल्हापुरातील प्रत्येकी १०, सोलापूरच्या सहाजणांचा समावेश
मुंबई : खरा पंचनामा
पोलिस दलाअंतर्गत २०१३ मध्ये झालेल्या पोलिस उपनिरीक्षक (अराजपत्रीत) गट परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या राज्यातील 496 अंमलदारांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. सोमवारी विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या सहीने याबाबतचे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने काढले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील १२, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी १० तर सोलापूरमधील सहाजणांचा समावेश आहे.
राज्य शासनातर्फे २०१३ मध्ये खात्याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या काही अंमलदारांना यापूर्वीच पदोन्नती देण्यात आली होती. न्यायप्रविष्ठ बाब आणि रिक्त जागा नसल्याने पात्र अंमलदारांना आतापर्यंत पदोन्नती देण्यात आली नव्हती. आज सोमवारी या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या 496 अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. यामुळे पोलिस अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पदोन्नतीसोबतच या उपनिरीक्षकांची विभागनिहाय नियुक्तीही करण्यात आली आहे.
पदोन्नती झालेल्याची जिल्हानिहाय नावे सांगली - संजीव जाधव, अरूण तावरे, जितेंद्र काळे, मारूती साळुंखे, रमेश चौगुले, केदार कुंभार, शीतल पाटील, महेश अष्टेकर, बाबासो पाटील, गजानन पोतदार, सुहास भिंगारदेवे, राजकुमार कर्नाळकर.
कोल्हापूर - अरूण वठारे, सुनिल आमते, राजेश चव्हाण, भगवान गिरीगोसावी, रविंद्र पाटील, कमलसिंग राजपूत, मंदिनी मोहिते, मोहन पाटील, सुभाष सुदर्शनी, हणमंत ढवळे.
सातारा - अनिल पवार, लक्ष्मण जाधव, बाबुराव वरे, श्रीधर ठोंबरे, भाऊसाहेब मदने, रविंद्र भोसले, संजय टिळेकर, हिमाकांत शिंदे, संजय धुमाळ, चंद्रकांत मुंगसे.
सोलापूर - चंद्रकांत चव्हाण, पंडित चव्हाण, चंद्रकांत मुंगसे, राजेंद्र वाघमारे, अशोक बाबर, विनय घाटे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.