Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संतोष देशमुख खून प्रकरणात आज आरोपपत्र दाखल होणार

संतोष देशमुख खून प्रकरणात आज आरोपपत्र दाखल होणार



बीड : खरा पंचनामा 

संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये सर्वात मोठी अपडेट हाती येत आहे. देशमुखांचा खून ज्या खंडणी प्रकरणातून झाला होता, त्या खंडणी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून सीआयडीकडून विशेष मकोका कोर्टामध्ये आज (गुरुवार) आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. साधारण १४०० ते १५०० पानांचं हे आपोपत्र असून यामध्ये अनेक मोठमोठे खुलासे झाल्याची माहिती आहे.

खंडणीचा तपास सीआयडीकडे असल्याने खंडणीचा मुख्य सूत्रधार कोण ते तपासामधून पुढे येणार आहे. खुनाचा तपास हा एसआयटीकडे होता. दोन्ही प्रकरणातील तपासी अधिकारी एकच असल्याने या प्रकरणात तातडीने आरोपपत्र दाखल होत आहे. खंडणी आणि खून प्रकरणात आतापर्यंत ९ आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. तर कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अद्यापही फरार आहे.

सीआयडीकडून विशेष मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे. आरोपपत्रामध्ये साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुराव्यांचा समावेश असणार आहे. तसेच वाल्मिक कारड यातला मुख्य सूत्रधार आहे की अन्य कोणी? हेदेखील पुढे येणार आहे. याशिवाय आरोपींना फरार होण्यासाठी कोणी मदत केली, कोणी कोणी आर्थिक मदत केली, याचाही तपास सीआयडीने केल्याची शक्यता असून त्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये आहे का, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करुन त्यांची निघृणपणे हत्या करण्यात आलेली होती. त्यापूर्वी ६ डिसेंबर रोजी आवादा कंपनीच्या गेटवर आरोपी आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला होता. आवादा कंपनीच्या गेटवर आरोपी खंडणी मागण्यासाठी गेले होते, हे स्पष्ट झालं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मिक कराड याची ही सगळी गँग असल्याचं तपासातून पुढे आलेलं आहे.

२९ नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडने विष्णू घुलेच्या मोबाईलवरुन आवादा कंपनीचे सुपरवायझर शिंदे यांना खंडणी मागितली होती. त्यामुळे पोलिसांनी वाल्मिक कराडसह इतरांचे व्हाईस सॅम्पल घेतलेले होते. एवढंच नाही तर सर्वच्या सर्व आरोपी हे २९ तारखेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेले आहेत. यातील एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. विशेष सरकारी वकील म्हणून राज्य शासनाने उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.