Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'आप'कडून विरोधी पक्षनेतेपदी आतिशी यांची निवड

'आप'कडून विरोधी पक्षनेतेपदी आतिशी यांची निवड



दिल्ली : खरा पंचनामा 

भाजपने दिल्लीमध्ये सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या रेखा गुप्ता यांनी शपथ घेतली आहे. आता 'आप' कडूनही दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, आमदारांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यासंदर्भात एकमत झाले आहे.

'आप'चे प्रमुख आणि पक्षाचे 22 आमदार यांच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय घेण्यात आले. दिल्ली विधानसभेचे पहिले अधिवेशन 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. हे सत्र 3 दिवस चालणार आहे. त्याआधी आता 'आप'कडून आतिशी यांच्या नावाची विरोधी पक्षनेतेपदासाठी घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर आतिशी या कालाकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर बोलताना आतिशी म्हणाल्या की, विरोधी पक्षनेता म्हणून माझ्याकडे विधीमंडळ पक्षाची जबाबदारी दिल्याबद्दल मी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची आभारी आहे. जनतेने आम्हाला विरोधीपक्षाची भूमिका बजावण्याची संधी दिली आहे. 'आप' किती सक्षम विरोधी पक्ष आहे हे दाखवून देईल.

पक्षाचे नेते गोपाल राय याबाबत बोलताना म्हणाले की, आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी या दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेत्या असतील याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. आव्हानात्मक काळात मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांनी दिल्लीतील लोकांची सेवा केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.