सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी मावळत्या आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडूंन स्वीकारला पदभार
प्रलंबित कामांना प्रधान्य देणार : ओंबासे
कलावती गवळी
सोलापूर : खरा पंचनामा
सोलापूर महापालिकेचे नूतन आयुक्त आणि यापुर्वी धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ. सचिन ओंबासे यांनी गुरुवारी दुपारी प्रथम त्यांनी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात जावुन दर्शन घेतले, त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्त कार्यालयात गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारांस मावळत्या आयुक्त शितल तेली उगले यांच्याकडूंन पदभार स्वीकारला. यावेळी मावळत्या आयुक्त शितल तेली उगले यांनी त्यांचे स्वागत केले. सोलापूर महापालिकेच्या मावळत्या आयुक्त शितल तेली उगले पदस्थापनेच्या प्रतिक्षेत आहेत.
नूतन आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी पदभार घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, शितल तेली उगले यांची सर्व प्रलंबित कामे मार्गी लावणार. सोलापूर महापालिकेत येणारा प्रत्येक नागरिकांच्या चांगल्या सुविधा मिळतील याकडे लक्ष दिले. जाईल त्याचबरोबर सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न कायमच चर्चेचा राहिला आहे. दुहेरी जलवाहिनी देखील लवकरात लवकर पूर्ण होण्याकडे आमचा फोकस राहणार आहे. यासाठी प्रसार माध्यमांची मदत आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच आठवड्यातील दोन दिवस खांस नागरिकांसाठी मी उपलब्ध आहे.
यावेळी सोलापूर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे रवी पवार आयुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सर्व विभाग प्रमुख खाते प्रमुख अधिकाऱ्यांची नूतन आयुक्तांनी बैठक घेवुन विविध कामांचा आढावा घेतला. डॉ. सचिन ओंबासे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. ते सोलापूर महानगरपालिकेचे 34 वे आयुक्त ठरले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.