सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन
परभणी : खरा पंचनामा
सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण जिल्ह्यातील हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत होता. कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर राज्यभरात मोठे आंदोलन झाले होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता.
मात्र शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून, पोलिसांकडून झालेल्या - मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर दोन महिन्यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर तूरनरसह कर्मचारी सतीश पैठणकर व मोहित पठाण, राजेश जठाल यांचे निलंबन करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, परभणीमध्ये १० डिसेंबर २०२४ रोजी स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ११ डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंद दरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली.
अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या ३५ वर्षीय तरूणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा खुलासा प्राथमिक अहवालातून झाला होता. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना जबाबदार मानून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती.
आता या प्रकरणी 3 पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर तूरनरसह कर्मचारी सतीश पैठणकर व मोहित पठाण, राजेश जठाल यांचे निलंबन करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.