Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

करजगीतील चिमुकलीवर अत्याचार करूनच खून, संशयित सराईत गुन्हेगार जलद गती न्यायालयात खटला चालवण्यासाठी प्रयत्न पोलिस अधीक्षक संदीप घुगे पहा व्हिडीओ

करजगीतील चिमुकलीवर अत्याचार करूनच खून, संशयित सराईत गुन्हेगार
जलद गती न्यायालयात खटला चालवण्यासाठी प्रयत्न  पोलिस अधीक्षक संदीप घुगे
पहा व्हिडीओ 



सांगली : खरा पंचनामा

जत तालुक्यातील करजगी येथे चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याचे पोस्ट मार्टम रिपोर्टनुसार प्राथमिकरित्या स्पष्ट झाले आहे. यातील संशयिताला तातडीने अटक करण्यात आली असून तो सराईत गुन्हेगार आहे. याचा तातडीने तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येईल तसेच हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.  


या घटनेप्रकरणी पांडुरंग सोमाण्णा कळ्ळी (वय ४५, रा. करजगी) याला अटक करण्यात आली आहे. करजगी येथील एक बालिका बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर जतचे पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्यासह उमदी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिचा शोध सुरू केला. यावेळी पोलिसांना कळ्ळी याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्या घरातील पेटीत पीडित बालिकेचा मृतदेह सापडला. त्यानंतर कळ्ळी याला अटक करण्यात आली. घटनेनंतर अधीक्षक घुगे, अतिरिक्त अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.  

यावेळी शांतता समितीची बैठक घेऊन अधीक्षक घुगे यांनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेच्या शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आला. त्याच्या प्राथमिक अहवालानुसार पीडित बालिकेवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्याचे घुगे यांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून या गुन्ह्याचा तपास जतचे उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्याकडे दिल्याचेही त्यांनी सांगितले. यातील संशयित कळ्ळी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत. त्याची पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर तो पीडितेच्या घरापासून काही अंतरावर बऱ्याच दिवसांपासून रहात होता असेही घुगे यांनी सांगितले. 

या घटनेबाबत चुकीची, दिशाभूल करणारी माहिती किंवा पोस्ट माध्यमांवर किंवा सोशल मिडियावर प्रसारित करू नये. पीडितेचे नाव, ओळख स्पष्ट होईल अशाप्रकारची माहिती पसरवणाऱ्यांवर तातडीने फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही घुगे यांनी दिला आहे. यावेळी एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.