राज्यातील नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
डॉ. राजेश देशमुख राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त, उपमुख्यमंत्री पवार यांच्या सचिव पदाचाही कार्यभार
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील तब्बल नऊ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी करण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने या बदल्यांचे आदेश दिले आहेत. कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांची राज्य उत्पादन शुल्कच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सचिव पदाचाही त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
बदली झालेले अधिकारी कंसात कोठून कोठे डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त राज्य उत्पादन शुल्क ते कोकण विभाग आयुक्त), नयना गुंडे (आदिवासी विकास आयुक्त ते महिला व बाल विकास आयुक्त पुणे), विमला आर. (प्रकल्प संचालक समग्र शिक्षा अभियान मुंबई ते निवासी आयुक्त महाराष्ट्र सदन, दिल्ली), सिद्धराम साळीमठ (जिल्हाधिकारी अहिल्यानगर ते साखर आयुक्त पुणे), मिलिंदकुमार साळवे (मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा), लीना बनसोड (कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळ ते आदिवासी विकास आयुक्त नाशिक), राहुल कुमार मीना (सहायक जिल्हाधिकारी, गडचिरोली ते मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर).
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.